श्रीगणेशा
१०
२०
३०
४०
५०
६०
७०
८०
९०
१००
रेडिक्का??????????
भिंतीकडे, झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून, दोन्ही हातांचे तळवे चेहर्यावर ठेऊन आपण सगळ्यांनीच ही गिनती केलेली आहे! "आंड्या इष्टॉप"... "गड्या गड्या माझं राज्य वाचव".... "रडीचा डाव खडी" असली वाक्यं लहानपणी न म्हणालेला कोणी सापडेल का? खेळ ह्या प्रकाराशी बहुतेकांची ओळख लपंडाव, रुमाल-पाणी, लंडन-लंडन, आप्पारप्पी, लगोरी असल्याच प्रकारांनी होते. आणि मग "अर्धं लिंबू अस्से" - "भिंतीवर डायरेक्ट बॉल लागला तर आउट" - "त्या उंबर्याच्या पलिकडे गेला की टू डी" वगैरे नियम घालून खेळणं सुरू होतं.
जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं खेळांतली क्लिष्टता वाढत जाते... नियम वाढतात, विविध साधनं उपयोगात आणली जातात. आपल्या लंगडी, खो-खो, कबड्डी सारख्या "फ्री-हँड" खेळांपासून, क्रिकेटसारख्या क्लिष्ट, बरीच साधनं लागणार्या खेळापर्यंत आपण सगळेच खूप खेळ खेळतो. खेळ खेळायची पद्धत, त्याचे नियम वेगवेगळे असतात पण एक नियम अगदी लपंडावापासून ते स्नूकरपर्यंत invariably लागू असतो तो म्हणजे - "चिडीची बात नस्से"! जे काही खेळताय ते तुम्ही चांगल्या मनाने, नैतिकता जपून, आपल्या सहकार्यांबद्दलच नव्हे तर स्पर्धकांबद्दलही आदर बाळगून, प्रामाणिकपणे खेळायचं ! विजयाइतकाच पराभवदेखील खुलेपणाने स्वीकारायचा. आणि पुढच्या वेळी विजय मिळवण्यासाठी पुन्हा कष्ट करायचे, प्रयत्न करायचे ! आणि ह्या सगळ्या गुणांच्या समुच्चयाला आम्ही म्हणतो "खिलाडू वृत्ती" "sportsman spirit".
अहो खेळ ह्या गोष्टीची व्याख्याच मुळी केली जाते ती - An organised, competitive and skilful physical activity requiring commitment and fair play अशी. बघा... शिस्तही आली, स्पर्धाही आली, कौशल्यही आलं, झोकून देणंही आलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आला. मग मला सांगा, "खेळाडू" ह्या संज्ञेस पात्र ठरलेला कोणीही एक आदर्श व्यक्ती, नागरिक असला तर आश्चर्य ते काय?
आणि म्हणूनच खेळांचा आनंद आणि खेळाडूंंच्या कामगिरीचा रसास्वाद घेण्यासाठी आज साक्षात सचिन तेंडुलकरच्या जन्मदिनी - २४ एप्रिल २०२० रोजी ह्या नव्या ब्लॉगचा श्रीगणेशा - एका खेळियाने.
© - आशुतोष थत्ते
२४ एप्रिल २०२०

10 टिप्पण्या:
Very good
Je baat!!! Ekdam jhaak suruvat jhaliye. Looking forward to more. 👍
Mastech as always
धन्यवाद
Ek no. Toshya. So happy to see you doing the stuff you are really gifted with ...
Thanks a lot for the encouraging words Kunal
क्या बात है तोश्या!! All the best!! J P Morgan woke up again ;)
Thanks Naikya :)
मस्त ओपनिंग! पुढच्या चौकार-षटकारांसाठी शुभेच्छा!
धन्यवाद ☺
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ