पांढर्यावर काळे
Sport builds character म्हणतात ते उगाच नाही. लहानपणापासून कोणी
कुठलाही खेळ (विशेषतः सांघिक) नियमित खेळत असेल तर त्याच्या
व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत जातात. कारण खेळ शिकणं म्हणजे फक्त त्या
खेळात सरस ठरण्यासाठी लागणारी कौशल्य, तंत्र आत्मसात करणं नाही तर अजूनही
खूप काही असतं. म्हणूनच खेळ हा केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षमच नाही तर एक
"सुसंस्कृत" नागरिक घडवतो.
विश्वनाथन आनंद टोपालोवला हरवलं म्हणून त्याच्या बुद्धीचे वाभाडे काढत नाही..... मायकेल हसी त्याच्या ओपनर्सना "फेकल्यात ना विकेट.. आता बसा बोंबलत.. मी नाही खेळणार" असं म्हणत नाही... "तिज्यायला हा फेडरर लई उडून र्हायलाय...तंगडं मोडायला पायजे *%$चं" असा विचार नदाल करत नाही.... किंवा "तुमच्या डबक्याचं पाणी फारच गार आहे ब्वॉ... नीट पोहता येत नाही इथे" असं फेल्प्स म्हणाल्याचंही ऐकिवात नाही. खरा खेळाडू citius - altius - fortius, faster - higher - stronger ह्या एकाच ध्यासानी आपल्या खेळाडू धर्माचं पालन करत असतो.
Winning isn't everything; it's the only thing असं मानणार्या जीवतोड स्पर्धेच्या जगात सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचं कौतुक केलं जातं, मुष्टियुद्धाच्या रानटी लढतीनंतरही एकमेकांना अलिंगन दिलं जातं आणि धक्कबुक्कीत खाली पडलेल्या प्रतिस्पर्ध्याला उठून उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो. एकंदरच खेळ आणि खेळाडू ही आपल्या आयुष्यातली एक खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक, आनंद, उत्साह, उमेद देणारी गोष्ट आहे. खेळातलं कौशल्य आपल्या आयुष्यातल्या इतरही गोष्टींत दिसून येतं,
खेळानी दिलेला आत्मविश्वास आपल्या प्रत्येक कामात दिसतो. कधी विचार केलात? ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाच्या वेळी वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंच्या देहबोलीत किती फरक असतो! काही अगदी छोटे, पदक मिळायची जरादेखील आशा नसलेले 'सिएरा लिओन', होंडुरास वगैरे देशांचे खेळाडू "आपण इथपर्यंत पोहोचलोय" हा आनंद लपवू शकत नाहीत तर अमेरिका, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे खेळाडू "आम्ही आलो आहोत ते जिंकण्यासाठीच" अश्या आत्मविश्वासात चालत असतात ! पण खेळ हीच एक अशी चीज आहे जी ह्या सगळ्यांना एका ध्येयासाठी, एका भावनेसाठी एकत्र आणते citius - altius - fortius ! आज युनायटेड नेशन्सचे 193 सदस्य देश आहेत... इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे 206....तर "फिफा"चे 211 ! भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय.... कुठलीच बंधनं नसणार्या खेळांचं महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे.
वेगवेगळ्या खेळांनी आपल्याला मानवाच्या शारिरिक क्षमतेला आणि कौशल्यालाच नाही तर खिलाडू वृत्तीला आणि सचोटीला नवीन परिमाण देणारे खेळाडू दिले. अगदी ४ मिनिटांच्या आत एक मैल धावण्याचा पराक्रम पहिल्यांदा करणार्या रॉजर बॅनिस्टरपासून ते चेल्सीसाठी जिवाचं रान करणार्या दिदिएर ड्रॉग्बापर्यंत.... कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन टूर दि फ्रान्स जिंकणार्या लान्स आर्मस्ट्राँगपासून ते "ड्रॅगफ्लिकचा बादशहा" सोहेल अब्बासपर्यंत.... मार्गरेट कोर्टपासून ते आमची बॅडमिंटनची राजकन्या साईना नेहवालपर्यंत ! ह्या सर्वच खेळाडूंनी आपल्या खेळानं आमच्यावर अशी काही मोहिनी घातली की "दुनिया देखती रह गयी". आपल्या कौशल्याने, आपल्या खेळाने आलम दुनियेला मंत्रमुग्ध करणारे हे खेळियेच. अश्याच काही महान खेळाडू आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने गाजवलेल्या लढती ह्यांचा आनंद घेण्यासाठी हे पांढर्यावर काळे!
© - आशुतोष थत्ते
२४ एप्रिल २०२०

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ