क्रीडायुद्धस्य कथा 2: वाहा(ब) जी वाहा(ब)
आपल्याला
ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ. आपल्याला ड्रामा आवडतो.
आपला हीरो कसा - हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १०
लोकांना लो़ळवील. पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला
खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली,
मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल
झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्या टीमनी तमुक
तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं
क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.
आत्ताचं जे क्रीडायुद्ध आपण बघणार आहोत ना ते म्हणजे खरंतर सलमान खानच्या पिक्चरसारखं होतं. त्याच्या पिक्चरमध्ये कसं - डायरेक्टर, कोरियोग्राफर, म्युझिक डायरेक्टर एकदम नावाजलेले, सिनेमॅटोग्राफी उच्च, हिरॉईन एकदम टकाटक, म्युझिक एकदम कॅची, पण आपल्याला माहिती असतं की स्टोरी बकवास आहे आणि तो पन्नाशीचा इसम शिंग मोडून कुंवारा असण्याचं "अॅक्टिंग" २-२:३० तास करणार. पण कधीमधी एखादा नवाझुद्दीन एखाद दोन सीन असे खाऊन टाकतो की वाटतं की पैसे वसूल झाले.
अॅडलेडचं सुंदर ग्राऊंड, वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीची उत्सुकता, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारखे कागदावर तुल्यबळ संघ. Mouthwatering clash म्हणावा इतका परफेक्ट माहौल होता. पण कुठेतरी आत माहित होतं की हा बार फुसका निघणार. आणि झालं ही तसंच. पाकिस्तानला अवघ्या २१३ धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियानी ६ गडी आणि तब्बल १६.१ षटकं राखून विजय मिळवला. सामन्याचा निकाल पाहिल्यावर अर्थातच एक एकतर्फी लढत दिसते आणि ती खरी झालीही तशीच. पण इथेही एक नवाजुद्दीन आपली करामत दाखवून गेला. अर्ध्या तासाचं फुटेज खाऊन गेला. एक अविस्मरणीय परफॉर्मन्स देऊन गेला. त्याचं नाव वहाब रियाझ.
आफ्रिदी बाद झाल्यावर ३४ व्या ओव्हरला जेव्हा वहाब बॅटिंगला आला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद १५८ धावा झाल्या होत्या. स्टार्क आणि हेझलवुडची गोलंदाजी अर्थातच वहाबला झेपत नव्हती. फॉकनर, मिचेल जॉन्सन शिवीगाळ करत होते. मागून हॅडिनची टकळी चालू होतीच. त्यातच स्लिप्समधून शेन वॉटसन म्हणाला "Are you holding a bat?". तेव्हा त्याला कल्पना नव्हती की जेमतेम दीड तासानंतर त्याला वहाबकडून बरंच ऐकावं लागणार होतं. पाकिस्तान जेमतेम २१६ पर्यंत पोहोचू शकले.
खरंतर इथेच सामन्याचा निकाल लागलेला होता. पक्क्या व्यावसायिक आणि चिवट ऑझी फलंदाजीसाठी हे लक्ष्य फार अवघड नव्हतंच. आणि त्यांनी सुरुवातही जोरदार केली. फिन्च लवकर बाद होऊनसुद्धा वॉर्नर आणि स्मिथ ८ व्या षटकापर्यंत ४४ पर्यंत पोचले होते. कर्णधार मिसबाह साठी शेवटचा एक्का उरला होता - वहाब रियाझ!
९ वं षटक टाकायला वहाब आला आणि तिसरा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर वाईड पडला. पुढचा चेंडू तसाच ऑफस्टंपच्या बाहेर पडला. मारायच्या मूडमध्ये असलेल्या वॉर्नरने पुन्हा बॅट फिरवली पण चेंडू फक्त थर्डमॅनला उभ्या असलेल्या राहत अली पर्यंतच गेला. वहाबने पाकिस्तानला बेहद्द जरूरी खिंडार पाडून दिलं होतं. बस!! अब शेर के मुंह खून लग चुका था! पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वर्ल्डकपचा करो या मरो सामना वाचवण्यासाठी गोलंदाजी करत होता. कोपर्यात गाठलेल्या वाघासारखा. त्याला माहित होतं की आता लढाई आर या पार होती. पकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करणं भाग होतं आणि त्यांचं एकमेव अस्त्र होतं वहाब रियाझ. वॉर्नरच्या विकेटची आयती भेट मिळाल्यावर रियाझ चवताळून उठणं साहाजिक होतं.
पुढच्याच षटकापासून रियाझने आखुड टप्प्याचा मारा सुरु केला. ऑझी कर्णधार क्लार्क पाठीच्या दुखापतीने त्रासला होता. त्याच्या ह्याच कच्च्या दुव्यावर रियाझने हल्ला केला. चौथाच चेंडू लेगस्टंपवरून जो उसळला तो क्लार्कच्या हेल्मेटच्या दिशेनेच. क्लार्कने आपलं डोकं वाचवण्याचा प्रयत्न केला पण शॉर्टलेगच्या सोहेब मक्सूदकडे झेल देण्यापलिकडे तो काहीच करू शकला नाही. वहाबने दोन षटकांत आपली दुसरी शिकार केली होती.
आणि खेळायला आला शेन वॉटसन. वहाब जणू दुपारचं स्लेजिंग डोक्यात ठेऊनच धडधडत निघाला. पहिलाच चेंडू वॉटसनच्या नाकासमोरून सरसरत यष्टिरक्षकाच्या ग्लव्हजमध्ये जाऊन थडकला.... पुढचा बॉल १५० किमी वेगाने सणसणत गेला..... वहाब आता धगधगत होता.... तो रनअप मध्येच वॉटसन समोर गेला... आपल्या सहकार्यांकडे बघून टाळ्या वाजवल्या... आणि वॉटसनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाला.... "Hello Shane, I'm Wahab"! ज्जे बात!! अब आयेगा मजा खेल का!! आता जरा सावरून बसायला हवं. चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणार्या वेगवान गोलंदाजासमोर कसलेला फलंदाज उभा असणं हे क्रिकेटमधलं सगळ्यात अप्रतीम दृश्य. एरवी निश्चितपणे बॅट्समन्स गेम असताना जेव्हा एक वेगवान गोलंदाज दंड थोपटून उभा राहातो तेव्हा भल्या भल्या फलंदाजांचं पाणी कळतं. स्मिथ आणि वॉटसनची आता खरी कसोटी होती.
पण म्हणतात ना.... बोलर्स हन्ट इन पेअर्स. वहाबला समोरून तोलामोलाच्या
साथीची गरज होती पण दुर्दैवानी वेगवान गोलंदाजांची खाण असलेल्या
पकिस्तानच्या संघात त्या दर्जाचा गोलंदाज नव्हता. राहत अलीच्या पुढच्या
षटकात ५ धावा काढायला स्मिथला काहीच तोशीस पडली नाही. आणि पुढे सामनाभर
देखील वहाबच्या समोरच्या बाजूनी रन्स जातच राहिल्या. त्यामुळे त्याच्या
आक्रमणाची धार नक्कीच जरा बोथट झाली.
आपल्या तिसर्या षटकासाठी वहाब पुन्हा चवताळून आला. दुसराच चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पडून वॉटसनच्या डोक्याच्या दिशेने झेपावला - पुन्हा तिसरा - पुन्हा सहावा. आता मात्र एक हुन्नरी वेगवान बोलर एका चांगल्या फलंदाजाला कळसूत्री बाहुलीसारखा नाचवत होता. एकीकडे स्मिथसारखा दर्जेदार फलंदाज धीरोदात्तपणे टिकून होता... पण त्याच्यापेक्षा काकणभरच कमी असलेल्या वॉटसनला मात्र चांगलीच कसरत करावी लागत होती. स्मिथ वहाबची आग थंड व्हायची वाट बघत होता पण वॉटसन मात्र कोळश्यांवर चालायला लावल्यासारखा नाचत होता. १९ आणि २१ मधला फरक आता दिसत होता. वॉटसनला टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर वहाब जणू आग पाखडत होता. बॉल वॉटसनच्या बरगड्यांवर आदळले... नाकासमोरून गेले... कानामागून गेले.... बॅटची कड घेऊन थर्डमॅनला गेले... पण १५ निवडणुका हरून एखादा नेता पक्षाध्यक्ष रहावा तसा वॉटसन कसाबसा टिकला होता.

वहाबच्या शॉर्ट चेंडूंनी वॉटसनला पुरता जखडला होता.... नटसम्राट गणपतराव बेलवलकरासारखा to be or not to be परिस्थीत अडकलेला. पार पार गुडघ्यावर टेकलेला, खचलेला, हरलेला, हताश.
वहाब आता आपल्या पाचव्या षटकासाठी पुन्हा जिवाच्या करारानी धावून आला. पहिल्याच चेंडूवर निकराचा हल्ला चढवत त्याने एक अप्रतीम बाउन्सर टाकला. आता मात्र वॉटसन केवळ हतबलतेने बॅट फिरवता झाला. बॉल फाइनलेगच्या दिशेने उडाला,....तो उडाला सामना... तो उडाला वर्ल्डकप.... फाइनलेगला निवांत उभ्या असलेल्या राहत अलीच्या हातात विसा....व.....
राहतनी सोडलेल्या त्या झेलानी वहाबच्या जणू शिडातली हवाच काढून घेतली.
एखाद्या रियाझी तबला नवाजाने अप्रतीम पलटे वाजवीत एखादी लयदार बंदिश
बांधावी आणि नेमकी शेवटच्या तिहाईला नगमा वाजवणार्याने सम चुकावी तसा त्या सुटलेल्या झेलानी
सगळ्या मैफिलीचा कचरा केला.
वहाब अर्थातच भडकलाआणि मग खचला. एका खंद्या लढवय्याप्रमाणे पुन्हा आक्रमणाला सज्ज झाला. पण आता ती वेळ टळून गेली होती... वॉटसनला नशीब आपल्या बाजूनी असल्याची जाणीव झाली. बुडत्याला काडीचा आधार मिळालेला होता. आता वॉटसनने त्याच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकली...पुढच्याच ओव्हरला त्याने सोहेल खानला पुलचा एक कडकडीत चौकार लगावला आणि आता निराळाच वॉटसन दिसायला लागला. काही मिनिटांपर्यंत कचरत खेळणार्या वॉटसनची देहबोलीच बदलली. वहाबची पुढची ओव्हर त्याने व्यवस्थित खेळून काढली. पूर्ण ताकदीने पाठोपाठ सहा षटकं टाकल्यावर वहाब थकला होताच. वहाब आणि वॉटसन - दोघांनाही कळालं होतं की द्वंद्व खरंतर संपलं आहे. वहाब आग ओकत असताना भिजलेल्या मांजरासारखा भेदरलेला वॉटसन संधी मिळताच डिवचलेल्या नागासारखा फणा काढून आला. त्याच्या साथीला आलेल्या मॅक्सवेलनी देखील धडाका लावला. एका वेळी पुरता नामोहरम झालेल्या वॉटसननंच रियाझला एक षटकार आणि एक चौकार ठोकून ह्या युद्धाचा निकाल लावला.
जिंकण्यासाठी हव्या असलेल्या ११६ धावा एका स्मिथच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने केवळ पुढच्या १५ षटकांत केल्या आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शत्रुराष्ट्र का असेना... एका क्रिकेटवेड्या आणि अतिशय प्रतिभाशाली खेळाडूंच्या संघाची ही शोकांतिका. एरवी खरोखरंच प्रतिभावान पोरं. दृष्ट लागावी असं टॅलेंट. काय ह्यांचे बोलर्स, काय त्यांचा स्विंग, काय त्यांचे विचित्र स्पिन्स - लाजवाब. पण मोक्याच्या वेळी तोळामासा स्थितीत नुसती प्रतिभा कामी येत नाही. त्याबरोबर लागतं टेंपरामेन्ट. डोकं थंड ठेवण्याची हातोटी. आणि इथेच त्या दिवशी पाकिस्ताननी कच खाल्ली. ऑस्ट्रेलियाच्या नसानसांत भिनलेली व्यावसायिकता त्यांच्या कामी आली. एखाद्या खेळाचं वा कलेचं प्रशिक्षण घेताना कौशल्य आत्मसात करण्याइतकंच, किंबहुना काकणभर जास्त महत्त्वाचं असतं ते टेंपरामेंट. अॅडलेडच्या ह्या क्रीडायुद्धानी क्रीडाप्रेमींना एका अविस्मरणीय द्वंद्वाचा आनंद दिला. आणि एक महत्त्वाची शिकवणही - Hard work beats Talent if Talent doesn't work hard!!
आत्ताचं जे क्रीडायुद्ध आपण बघणार आहोत ना ते म्हणजे खरंतर सलमान खानच्या पिक्चरसारखं होतं. त्याच्या पिक्चरमध्ये कसं - डायरेक्टर, कोरियोग्राफर, म्युझिक डायरेक्टर एकदम नावाजलेले, सिनेमॅटोग्राफी उच्च, हिरॉईन एकदम टकाटक, म्युझिक एकदम कॅची, पण आपल्याला माहिती असतं की स्टोरी बकवास आहे आणि तो पन्नाशीचा इसम शिंग मोडून कुंवारा असण्याचं "अॅक्टिंग" २-२:३० तास करणार. पण कधीमधी एखादा नवाझुद्दीन एखाद दोन सीन असे खाऊन टाकतो की वाटतं की पैसे वसूल झाले.
अॅडलेडचं सुंदर ग्राऊंड, वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीची उत्सुकता, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारखे कागदावर तुल्यबळ संघ. Mouthwatering clash म्हणावा इतका परफेक्ट माहौल होता. पण कुठेतरी आत माहित होतं की हा बार फुसका निघणार. आणि झालं ही तसंच. पाकिस्तानला अवघ्या २१३ धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियानी ६ गडी आणि तब्बल १६.१ षटकं राखून विजय मिळवला. सामन्याचा निकाल पाहिल्यावर अर्थातच एक एकतर्फी लढत दिसते आणि ती खरी झालीही तशीच. पण इथेही एक नवाजुद्दीन आपली करामत दाखवून गेला. अर्ध्या तासाचं फुटेज खाऊन गेला. एक अविस्मरणीय परफॉर्मन्स देऊन गेला. त्याचं नाव वहाब रियाझ.
आफ्रिदी बाद झाल्यावर ३४ व्या ओव्हरला जेव्हा वहाब बॅटिंगला आला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद १५८ धावा झाल्या होत्या. स्टार्क आणि हेझलवुडची गोलंदाजी अर्थातच वहाबला झेपत नव्हती. फॉकनर, मिचेल जॉन्सन शिवीगाळ करत होते. मागून हॅडिनची टकळी चालू होतीच. त्यातच स्लिप्समधून शेन वॉटसन म्हणाला "Are you holding a bat?". तेव्हा त्याला कल्पना नव्हती की जेमतेम दीड तासानंतर त्याला वहाबकडून बरंच ऐकावं लागणार होतं. पाकिस्तान जेमतेम २१६ पर्यंत पोहोचू शकले.
खरंतर इथेच सामन्याचा निकाल लागलेला होता. पक्क्या व्यावसायिक आणि चिवट ऑझी फलंदाजीसाठी हे लक्ष्य फार अवघड नव्हतंच. आणि त्यांनी सुरुवातही जोरदार केली. फिन्च लवकर बाद होऊनसुद्धा वॉर्नर आणि स्मिथ ८ व्या षटकापर्यंत ४४ पर्यंत पोचले होते. कर्णधार मिसबाह साठी शेवटचा एक्का उरला होता - वहाब रियाझ!
९ वं षटक टाकायला वहाब आला आणि तिसरा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर वाईड पडला. पुढचा चेंडू तसाच ऑफस्टंपच्या बाहेर पडला. मारायच्या मूडमध्ये असलेल्या वॉर्नरने पुन्हा बॅट फिरवली पण चेंडू फक्त थर्डमॅनला उभ्या असलेल्या राहत अली पर्यंतच गेला. वहाबने पाकिस्तानला बेहद्द जरूरी खिंडार पाडून दिलं होतं. बस!! अब शेर के मुंह खून लग चुका था! पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वर्ल्डकपचा करो या मरो सामना वाचवण्यासाठी गोलंदाजी करत होता. कोपर्यात गाठलेल्या वाघासारखा. त्याला माहित होतं की आता लढाई आर या पार होती. पकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करणं भाग होतं आणि त्यांचं एकमेव अस्त्र होतं वहाब रियाझ. वॉर्नरच्या विकेटची आयती भेट मिळाल्यावर रियाझ चवताळून उठणं साहाजिक होतं.
पुढच्याच षटकापासून रियाझने आखुड टप्प्याचा मारा सुरु केला. ऑझी कर्णधार क्लार्क पाठीच्या दुखापतीने त्रासला होता. त्याच्या ह्याच कच्च्या दुव्यावर रियाझने हल्ला केला. चौथाच चेंडू लेगस्टंपवरून जो उसळला तो क्लार्कच्या हेल्मेटच्या दिशेनेच. क्लार्कने आपलं डोकं वाचवण्याचा प्रयत्न केला पण शॉर्टलेगच्या सोहेब मक्सूदकडे झेल देण्यापलिकडे तो काहीच करू शकला नाही. वहाबने दोन षटकांत आपली दुसरी शिकार केली होती.
आणि खेळायला आला शेन वॉटसन. वहाब जणू दुपारचं स्लेजिंग डोक्यात ठेऊनच धडधडत निघाला. पहिलाच चेंडू वॉटसनच्या नाकासमोरून सरसरत यष्टिरक्षकाच्या ग्लव्हजमध्ये जाऊन थडकला.... पुढचा बॉल १५० किमी वेगाने सणसणत गेला..... वहाब आता धगधगत होता.... तो रनअप मध्येच वॉटसन समोर गेला... आपल्या सहकार्यांकडे बघून टाळ्या वाजवल्या... आणि वॉटसनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाला.... "Hello Shane, I'm Wahab"! ज्जे बात!! अब आयेगा मजा खेल का!! आता जरा सावरून बसायला हवं. चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणार्या वेगवान गोलंदाजासमोर कसलेला फलंदाज उभा असणं हे क्रिकेटमधलं सगळ्यात अप्रतीम दृश्य. एरवी निश्चितपणे बॅट्समन्स गेम असताना जेव्हा एक वेगवान गोलंदाज दंड थोपटून उभा राहातो तेव्हा भल्या भल्या फलंदाजांचं पाणी कळतं. स्मिथ आणि वॉटसनची आता खरी कसोटी होती.
www.espncricinfo.com
आपल्या तिसर्या षटकासाठी वहाब पुन्हा चवताळून आला. दुसराच चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पडून वॉटसनच्या डोक्याच्या दिशेने झेपावला - पुन्हा तिसरा - पुन्हा सहावा. आता मात्र एक हुन्नरी वेगवान बोलर एका चांगल्या फलंदाजाला कळसूत्री बाहुलीसारखा नाचवत होता. एकीकडे स्मिथसारखा दर्जेदार फलंदाज धीरोदात्तपणे टिकून होता... पण त्याच्यापेक्षा काकणभरच कमी असलेल्या वॉटसनला मात्र चांगलीच कसरत करावी लागत होती. स्मिथ वहाबची आग थंड व्हायची वाट बघत होता पण वॉटसन मात्र कोळश्यांवर चालायला लावल्यासारखा नाचत होता. १९ आणि २१ मधला फरक आता दिसत होता. वॉटसनला टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर वहाब जणू आग पाखडत होता. बॉल वॉटसनच्या बरगड्यांवर आदळले... नाकासमोरून गेले... कानामागून गेले.... बॅटची कड घेऊन थर्डमॅनला गेले... पण १५ निवडणुका हरून एखादा नेता पक्षाध्यक्ष रहावा तसा वॉटसन कसाबसा टिकला होता.
www.espncricinfo.com
वहाबच्या शॉर्ट चेंडूंनी वॉटसनला पुरता जखडला होता.... नटसम्राट गणपतराव बेलवलकरासारखा to be or not to be परिस्थीत अडकलेला. पार पार गुडघ्यावर टेकलेला, खचलेला, हरलेला, हताश.
वहाब आता आपल्या पाचव्या षटकासाठी पुन्हा जिवाच्या करारानी धावून आला. पहिल्याच चेंडूवर निकराचा हल्ला चढवत त्याने एक अप्रतीम बाउन्सर टाकला. आता मात्र वॉटसन केवळ हतबलतेने बॅट फिरवता झाला. बॉल फाइनलेगच्या दिशेने उडाला,....तो उडाला सामना... तो उडाला वर्ल्डकप.... फाइनलेगला निवांत उभ्या असलेल्या राहत अलीच्या हातात विसा....व.....
www.espncricinfo.com
वहाब अर्थातच भडकलाआणि मग खचला. एका खंद्या लढवय्याप्रमाणे पुन्हा आक्रमणाला सज्ज झाला. पण आता ती वेळ टळून गेली होती... वॉटसनला नशीब आपल्या बाजूनी असल्याची जाणीव झाली. बुडत्याला काडीचा आधार मिळालेला होता. आता वॉटसनने त्याच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकली...पुढच्याच ओव्हरला त्याने सोहेल खानला पुलचा एक कडकडीत चौकार लगावला आणि आता निराळाच वॉटसन दिसायला लागला. काही मिनिटांपर्यंत कचरत खेळणार्या वॉटसनची देहबोलीच बदलली. वहाबची पुढची ओव्हर त्याने व्यवस्थित खेळून काढली. पूर्ण ताकदीने पाठोपाठ सहा षटकं टाकल्यावर वहाब थकला होताच. वहाब आणि वॉटसन - दोघांनाही कळालं होतं की द्वंद्व खरंतर संपलं आहे. वहाब आग ओकत असताना भिजलेल्या मांजरासारखा भेदरलेला वॉटसन संधी मिळताच डिवचलेल्या नागासारखा फणा काढून आला. त्याच्या साथीला आलेल्या मॅक्सवेलनी देखील धडाका लावला. एका वेळी पुरता नामोहरम झालेल्या वॉटसननंच रियाझला एक षटकार आणि एक चौकार ठोकून ह्या युद्धाचा निकाल लावला.
www.starsports.com
जिंकण्यासाठी हव्या असलेल्या ११६ धावा एका स्मिथच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने केवळ पुढच्या १५ षटकांत केल्या आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शत्रुराष्ट्र का असेना... एका क्रिकेटवेड्या आणि अतिशय प्रतिभाशाली खेळाडूंच्या संघाची ही शोकांतिका. एरवी खरोखरंच प्रतिभावान पोरं. दृष्ट लागावी असं टॅलेंट. काय ह्यांचे बोलर्स, काय त्यांचा स्विंग, काय त्यांचे विचित्र स्पिन्स - लाजवाब. पण मोक्याच्या वेळी तोळामासा स्थितीत नुसती प्रतिभा कामी येत नाही. त्याबरोबर लागतं टेंपरामेन्ट. डोकं थंड ठेवण्याची हातोटी. आणि इथेच त्या दिवशी पाकिस्ताननी कच खाल्ली. ऑस्ट्रेलियाच्या नसानसांत भिनलेली व्यावसायिकता त्यांच्या कामी आली. एखाद्या खेळाचं वा कलेचं प्रशिक्षण घेताना कौशल्य आत्मसात करण्याइतकंच, किंबहुना काकणभर जास्त महत्त्वाचं असतं ते टेंपरामेंट. अॅडलेडच्या ह्या क्रीडायुद्धानी क्रीडाप्रेमींना एका अविस्मरणीय द्वंद्वाचा आनंद दिला. आणि एक महत्त्वाची शिकवणही - Hard work beats Talent if Talent doesn't work hard!!

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ