खासियत खेळियाची 3 - पुल इट लाईक पंटर !
पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे. तो उर्मटपणा नसानसात भिनलेला आपला खेळिया म्हणजे आपलं "punter" (जुगारी) हे नामाभिधान सार्थ ठरवणारा रिकी पाँटिंग!
प्रत्येक बॅट्समनचा एक लाडका शॉट असतो. आणि तो शॉट जर अडी-अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला धावून येत असेल तर क्या कहने! पुल हा तर पाँटिंगचा खास दोस्त होता. बोलर नको इतका डोईजड होतोय किंवा रन्स होत नसतील तर पुल त्याच्या मदतीला सच्च्या मित्रासारखा धावून जायचा. जखडला गेल्यावर साखळ्या तोडायला पाँटिंग हमखास पुल वापरायचा.
कल्पना करा, इंग्लंड किंवा न्युझीलंड मधल्या हिरव्यागार पिचवर दर्जेदार फास्ट बोलर्सनी पाँटिंगला जेरीस आणलं आहे. आउटस्विंगर बॅटची कड घेता घेता राहातोय. आत येणारा चेंडू पाँटिंग कसाबसा खेळून काढतोय. बोलर्सचं स्लेजिंग चालू आहे. पाँटिंग वैतागलेला स्पष्ट दिसतोय. Something's gotta give. इतक्यात बॉल किंचित शॉर्ट पडतो - पंटर आपल्या "पुल मोड" मध्ये जातो. किंचित खाली वाकून उजवा पाय थोडा मागे घेतो. वर येता येताच डोकं मागे घेऊन तो आपला तोल मागच्या पायावर "शिफ्ट"करतो. डावा पाय बॅलन्स सांभाळायला वर जातो आणि हात कोपरात न वाकवता एखाद्या लढवयाने दांडपट्टा फिरवावा तश्या चपळाईने चेंडू सणसणीत हाणतो. हा पुल म्हणजे हीरोनी ज्युनियर व्हिलनला कानफटात मारावी तसा असतो. त्यामध्ये तसूभरही बचाव नसतो. परिपूर्ण आक्रमकता! खेळाचं सगळं समीकरणच बदलून जातं. बॅट्समनचं पारडं जड झालेलं बोलरच्याही देहबोलीतून जाणवतं. तो एक शॉट पाँटिंगला आणि पर्यायाने ऑस्ट्रेलियाला पुन्हा आत्मविश्वास देऊन जातो.
आणि एकदा का आत्मविश्वास परत मिळाला की तर पाँटिंगला पुल मारण्यासाठी बॉल शॉर्ट पडायची देखील गरज नसते. तो अगदी लेंग्थ बॉलवर सुद्धा उभ्या उभ्या मिडऑन ते फाईनलेग पट्ट्यात त्याला हव्या त्या ठिकाणी पुल मारतो. मग समोर अॅम्ब्रोस असो वा डोनाल्ड असो वा शोएब! त्या द्वंद्वाचा विजेता तिथेच ठरून जातो.
क्रिकेटमध्ये बोलरला पुल "मारला" जात नाही बोलर पुल "खातो". इथे नाजुकपणाला थारा नाही. आणि त्याला कारणही तसंच आहे. चांगले फास्ट बोलर्स तुम्हाला पाय मागे टाकून अंग बॉलच्या लाइनीत आणून बॉलच्या वर जाऊन वगैरे पुल मारण्याइतका वेळच मुळात देत नाहीत. फास्ट बोलरला पुल मारायचा तर बॅट्समनचा बॅलन्स, आत्मविश्वास, त्याचं hand eye coordination आणि चपळता सर्वोच्च प्रतीचं असावं लागतं. पुल म्हणजे हात वाकवुन अंगावरचं झुरळ झटकल्याप्रमाणे बॉल मारण्याचं कामच नाही. अस्सल बॅट्समन हात न वाकवता बॉल मन मानेल त्या दिशेला मारतो. पुन्हा काही चुकलंच तर तो तोफगोळा आपल्या छातीवर झेलण्याची तयारी लागते. म्हणून पुल हा कलाकाराचा नाही तर योद्ध्याचा शॉट आहे. आणि रिकी पाँटिंग हा अव्वल दर्जाचा योद्धा होता.
२०-२० च्या जमान्याच्या कितीतरी आधी पाँटिंगने फलंदाजांना दिलेली देणगी म्हणजे त्याचा पुल. १५० किमी वेगाच्या बॉलवर आडव्या बॅटने हल्ला चढवण्याचं कसब पहिल्यांदा दाखवलं ते पाँटिंगने. अगदी ऑस्ट्रेलियन संघही अडचणीत सापडल्यावर आपल्या कर्णधाराच्या पुल सारख्याच तडफेने कोपर्यात अडकलेल्या वाघासारखा चवताळून counter attack करायचा. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ज्या निर्दय बेदरकारपणाने ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं - त्याचं साक्षात द्योतक म्हणजे त्याचा पुल. म्हणूनच तर म्हणतात -

१५ मे २०२०

पुल इट लाइक पंटर!
१५ मे २०२०

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ